• Thu. Jun 19th, 2025

लाक्षणिक उपोषण : सोयीचे असलेली आमची गावे विनाकारण कासारसिरसी जोडू नका…

Byjantaadmin

Jul 24, 2023
निलंगा, ता. २४ : अप्पर तहसीलच्या विभाजणाचा अथवा नागरिकांची कोणतीही मागणी नसताना शासन स्तरावरून कासारसिरसी येथील अप्पर तहसीलचा नागरिकांवरती लादलेला निर्णय वादाच्या भोवर्यात सापडला असून भौगोलिकदृष्ट्या सोयीचे असलेलीआमची गावे विनाकारण कासारसिरसी येथे जोडू नकाअशी मागणी निम्यापेक्षा अधिक गावाने केली असून त्यामुळे तालुक्यात आता राजकीय संघर्ष होणार आहे.
औसा विधानसभा मतदार संघाला जोडलेल्या निलंगा तालुक्यातील ६३ महसूली गावासाठी कासारसिरसी ता. निलंगा येथे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याबाबत नुकताच शासन आदेश आला आहे. या अप्पर तहसील कार्यालयाशी कासार सिरसी, कासार बालकुंदा, मदनसुरी, भूतमुगळी यासह अन्य मंडळातील कांही गावे असे एकूण ६३ महसुली गावांचा प्रशासकीय कारभार अपर तहसीलदार कार्यालयातून चालणार आहे. यासाठी अनेक गावांनी कडाडून विरोध केला आहे. शिवाय आम्हाला निलंगा येथेच तहसील व अन्य कार्यालय सोईचे होणार असून निलंगा येथे पंचायत समिती, उपविभागीय कार्यालय, पोलिस आधिकारी कार्यालय, सहकार कार्यालय, भुमिअभिलेख कार्यालय, न्यायालय असे अनेक कार्यालय आहेत. त्यामुळे एका कामामध्ये विविध विभागाचे काम करता येतात शिवाय अनेक गावांना निलंगा शहर जवळ तर कासारसिरसी अंतर दुरवर होणार असल्याने तालुक्यातील जवळपास 45 गावांनी यासाठी ग्रामपंचायतचे ठराव घेऊन आम्हाला निलंगा तालुका तहसील कार्यावायातच ठेवा अशी मागणी बहूतांश गावातील ग्रामपंचायतीने निलंगा येथेच आमचे गाव ठेवावे या मागणीसाठीचे ठराव घेतले आहे.
माजी मुख्यमंत्री डाॕ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यानी कधीही तालुक्याचे विभाजण होऊ दिले नाही. अनेक विभागीय व उपविभागीय कार्यालये निलंगा येथे आणली मात्र या तालुयाचे तुकडे पाडण्याचे काम कांही राजकारणी करत असल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला आहे. वेगळे अप्पर तहसील कार्यालयाची नागरिकांची कधीही मागणी केली नाही शिवाय प्रशासकडूनही याबाबतचा प्रस्ताव मागणी केली नाही. तरीही अट्टासाने हा निर्णय घेतला आहे.
कर्मयोगी डाॕ. शिवाजीराव पाटील निलंगेकर तालुका एकसंघ कृती समितीच्या वतीने  उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांना आम्हाला निलंगा येथेच ठेवण्यात यावे यासाठी लाक्षणिक उपोषण सुरू कृरून निवेदन दिले आहे. शिवाय यापूढे अधिक तिव्रतेने आंदोलन केले जाईल असा इशारा या निवेदनावर तालुकाध्यक्ष संभाजी तारे, कार्याध्यक्ष अशोक सूर्यवंशी, सचिव दयानंद मुळे, उपाध्यक्ष रामकिशन सावंत, अनिल आरीकर यासह आदीच्या स्वाक्षर्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *