लहुजी सेनेच्या वतीने उपोषणास बसलेल्या अंगद वाघमारे यांना काँग्रेसचा पाठिंबा ; माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी शासन दरबारी मागण्या मांडण्याचे दिले आश्वासन
लातूर:-राज्यातील सरकारकडे समाजाच्या विविध मागण्यासाठी लहुजी सेनेच्या वतीने दोन दिवसापासून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या लातूर येथील पुतळ्याजवळ अंगद वाघमारे यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लक्षवेधी उपोषण सुरू केले होते दरम्यान शनीवारी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी उपोषण स्थळी अंगद वाघमारे व त्यांच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांची भेट घेऊन आपल्या मागणीला काँग्रेसचा पाठिंबा जाहीर केला तसेच आपल्या मागण्यासाठी राज्य सरकारकडे आम्ही पाठपुरावा करू असे आश्वासन दिल्याने लहुजी सेनेच्या कार्यकर्त व अंगद वाघमारे यांनी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते नारळाचे पाणी घेवून उपोषण सोडले
यावेळी राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव बाजुळगे, उपाध्यक्ष शाम भोसले, रेणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अनंतराव देशमुख, काँग्रेसच्या अनुसुचीत सेल चे जिल्हाध्यक्ष अँड बाबासाहेब गायकवाड,जिल्हा काँग्रेसचे समन्वयक सचिन दाताळ, सदाशिव कदम सचिन पाटील, सदाशिव कदम बालाजी साळुंखे संभाजी सुळ प्रवीण पाटील सुपर्ण जगताप आदी मान्यवर उपस्थित होते