दयानंद कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
दयानंद कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे डी.फार्मसी परीक्षेत भरारी
लातूर ;-महाराष्ट्रात गुणवत्तेची खाण असलेल्या लातूर येथील दयानंद शिक्षण संस्था अंतर्गत दयानंद कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन मार्फत घेण्यात येणाऱ्या डी.फार्मसी उन्हाळी २०२३ परीक्षेत घवघवीत यश मिळवले असून डी.फार्मसी द्वितीय वर्षामधून कु.सदाफ मोमीन ८५.४६%, कु.वचने शिवकन्या ८५.३६%, कु.कदम मनीषा ८४.३६% गुण मिळवून महाविद्यालयातून अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. तर डी.फार्मसी प्रथम वर्षामधून डोंगरे नागेश ७८%,घोलप सौरभ ७७% आणि कु.भुजबळ श्रावणी ७६.८०% गुण मिळवून महाविद्यालयांमधून अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला आहे.
प्रथम वर्षातून ५६ तर द्वितीय वर्षातून ४१ विद्यार्थी प्रथम श्रेणीतून विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. यामुळेच दयानंद शिक्षण संस्थेच्या विविध अभ्यासक्रमाच्या गुणवत्तेत भरारी घेत दयानंद फार्मसीने पॅटर्न निर्माण केला आहे.
या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांनी प्राचार्या डॉ.क्रांती सातपुते यांना व सर्व प्राध्यापक आणि त्यांच्या अथक परिश्रमांना आहे. असे यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितले.
गुणवंत विद्यार्थ्यांचे दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष अरविंद सोनवणे, ललितकुमार शहा, रमेश राठी सचिव रमेश बियाणी, सहसचिव सुरेश जैन, कोषाध्यक्ष संजय बोरा आणि प्राचार्य व प्राध्यापक,संस्थेच्या सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.