• Sun. Jun 22nd, 2025

कासारसिरसी येथे स्वतंत्र अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यास शासनाची मंजुरी

Byjantaadmin

Jul 19, 2023
कासारसिरसी येथे स्वतंत्र अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यास शासनाची मंजुरी
निलंगा / प्रतिनिधी:- आमदार अभिमन्यू पवार यांनी मागच्या ३. ५ वर्षांमध्ये मतदारसंघ ते मंत्रालय असा केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा यशस्वी झाला असून आवश्यक पनिर्मितीसह कासार सिरसी येथे स्वतंत्र अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यास (दि. १८) जुलै रोजी महायुती सरकारने मंजुरी दिली आहे.
कासारसिरसी, कासार बालकुंदा, मदनसुरी, भूतमुगळी व औराद शहाजनी मंडळातील ६३ महसुली गावांचा प्रशासकीय कारभार कासार सिरसी येथील स्वतंत्र अपर तहसीलदार कार्यालयातून चालेल. विधानसभा मतदारसंघ वेगळा आणि तहसील
कार्यालयाचे ठिकाणे वेगळे असल्याने कासारसिरसी मंडळातील नागरिकांची जी काही प्रशासकीय अडचण व्हायची ती आता कायमची दूर होणार आहे. आमदार अभिमन्यू पवार यांनी २०१९ विधानसभा निवडणुकीत कासार सिरसी मंडळातील नागरिकांना दिलेले आणखीन एक वचन यानिमित्ताने पूर्णत्वास गेले आहे. याबद्दल आमदार अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे कासार सिरसी मंडळातील नागरिकांच्या वतीने आभार मानले आहेत.
किल्लारीचाही प्रस्ताव किल्लारी येथील अपर तहसील कार्यालयासाठीही पाठपुरावा सुरु असून त्याचाही प्रस्ताव प्रक्रि आहे. त्या प्रयत्नांनाही लवकरच यश येईल असा ठाम विश्वास आमदार अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *