• Sun. Jun 22nd, 2025

मसलगा जिल्हा परिषद शाळेच्या नुतन इमारतींमध्ये नियमित वर्ग भरण्यास सुरुवात

Byjantaadmin

Jul 18, 2023
मसलगा जिल्हा परिषद शाळेच्या नुतन इमारतींमध्ये नियमित वर्ग भरण्यास सुरुवात
निलंगा(दि.१८): निलंगा तालुक्यातील मसलगा जिल्हा परिषद शाळेच्या ५० लाख रुपयांयात ८ वर्ग खोल्याचे बांधकाम पूर्ण झाले असून नुतन इमारतींमध्ये वर्ग भरण्यास सुरुवात करण्यात आली.
                मसलगा जिल्हा परिषद शाळेची जुनी इमारत मोडकळीस आली होती. ही बाब माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निदर्शनास तत्कालीन सरपंच प्रतिनिधी रमेश पाटील यांनी आणून दिली असता. तत्कालीन निलंगा पंचायत समिती च्या सभापती राधाबाई बिराजदार व लातूर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा शिक्षण सभापती भारतबाई साळुंके यांनी शाळेची पाहणी केली. नविन इमारतीसाठी प्रस्ताव पाठविण्यास सांगितले.  माजी मंत्री आमदार संभाजीराव निलंगेकर व युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या शिफारशीनुसार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्षानी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. व दि. २ ऑक्टोबर २०२२ रोजी मसलगा येथे विविध विकासकामांच्या भुमीपुजन व लोकार्पण सोहळ्यात आमदार निलंगेकर व गुरूवर्य गुरूबाबा महाराज औसेकरांच्या हस्ते नुतन शाळेच्या इमारतीचे भुमीपुजन झाले होते. अतिशय कमी कालावधीत मसलगा जिल्हा परिषद शाळेच्या ८ वर्ग खोल्याचे काम युद्धपातळीवर करून दिनांक १८ जुलै २०२३ रोजी नुतन सरपंच गणेश शेळके यांच्या हस्ते सत्यनारायणाची विधीवत पुजा करुन शाळा भरण्यास सुरुवात करण्यात आली.
           या शाळेच्या इमारत बांधकामात अनेकांनी सहकार्य केल्याचे सांगत लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, ग्रामपंचायत मसलगा तसेच ग्रामस्थाचे शाळेचे मुख्याध्यापक मोहन मोरे यांनी आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *