राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियाण अंतरगत शेडोळ पंचायत समिती गणाची कार्यशाळा संपन्न
निलंगा:-शेडोळ पंचायत समिती गणाचे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान आंतर्गत सन 2022 -23 चे ग्रामपंचायत आराखडा संबंधीचे प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केलेली होती. दिनांक 3 -11- 2022 रोजी सकाळी ठीक 10.00वाजता आत्माराम महाराज मंदिर, शिडोळ येथेआयोजित करण्यात आलेली होती.
शेडोळ गणाचे प्रभारी अधिकारी तथा पं.स. निलंगा येथील शाखा अभियंता श्री मौजन ए.आर. यांनी शेडोळ गणाची कार्यशाळा घेताना राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान आंतर्गत “आमचा गाव आमचा विकास” बाबत सन २०३० पर्यंत शास्वत विकासाचे ध्येय मध्ये निर्धारीत केलेले उद्दिष्ठे साध्य करन्यासाठी शासनाने दिलेल्या ९ थिम्स बाबत सुक्ष्मरित्या प्रशिक्षण दिले. व दुपारच्या सत्रात मिशन अंतोदय व १५ वित्त आयोगाचा आराखडा या ९ थिम्स ना समाविष्ट करुन व बंधीत निधी व अबंधीत निधी, मानव निर्देशांक बाबत व तसेच महिला व बालकल्याण, व गावातील लोकसंख्येच्या धरतीवर अनुसुचीत जाती व जमाती यांच्या टक्केवारी नुसार आराखडा कसा बनवायचा याबाबत अंतरभूत एक एक मुद्याची माहीती पावर पाँईंट प्रझेंटेशन द्वारे स्क्रीन लावुन दिली.
सर्व गणातील ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांनी सदर प्रशिक्षणास सरपंच/उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य,महिला स्वयंसहाय्यता गटाच्या ग्रामसंघ अध्यक्ष /सचिव, समूह संसाधन व्यक्ती,अंगणवाडी सेविका, गावास्तरीय सर्व शासकीय कर्मचारी सर्व प्रशिक्षणास हजर होते व तसेच सदर प्रशिक्षनाचे नियोजन शेडोल गावचे सरपंच श्री विकास पाटील यांनी केले.अशाप्रकारे सदरची कार्यशाळा ही अतिशय उत्कृष्ट प्रकारे संपन्न झाली.