लातूर जिल्ह्यात आम आदमी पक्ष नव्याने घेणार उभारी
– भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहातील पत्रकार परिषदेत प्रदेश सचिव अॅड. अजित खोत यांची माहिती
लातूर – लातूर जिल्ह्यात आम आदमी पक्षाचे आस्तित्व आहे. मात्र काही जुने पदाधिकारी पक्ष सोडुन गेल्यामुळे नव्या जोमाने पक्ष बांधणी करण्यात येत आहे. लवकर आम आदमी पक्ष लातूर जिल्ह्यात नव्याने उभारी घेवून आगामी सर्व निवडणूका लढविणार असल्याची माहिती आज 16 जुलै रोजी लातुरातील भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव अॅड. अजित खोत यांनी दिली आहे.
आज 16 जुलै रोजी आम आदमी पक्षाच्या पदाधिकार्यांची बैठक झाली. या बैठकीत लातूरच्या जिल्हाध्यक्षपदी अश्विन सुभाषराव नलबले, सचिव दिपक कानेकर, युवा विंगचे अध्यक्ष नरेश तौर, प्रसिद्धी प्रमुख ओंकार गोटेकर यांची नावे निश्चित झाली आहेत. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांचे जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. लोकशाहीची हत्या होत असून जनतेच्या मतांचा अनादर केला जाण्याचा शर्मनाक प्रकार घडत आहे. सध्या लातूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातही आम आदमी पक्षाचे संघटना बांधणीचे काम मोठ्या जोमाने सुरु आहेत. विशेषता युवा वर्ग जोडला जात आहे. लवकरच जनसंवाद यात्रा काढून तळागाळातील जनतेशी संवाद साधला जाणार आहे. आणि त्यानंतर आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सभांचे आयोजन केले जाणार आहे.असेही प्रदेश सचिव अॅड. खोत यांनी यावेळी सांगितले.
या पत्रकार परिषदेला अश्विन नलबले, दिपक कानेकर, नरेश तौर, ओंकार गोटेकर, सुमित दिक्षीत, बी. के. गादगे, याह्या मग्रजी, आनंद कामगुंंडा, विक्रांत शंके, अॅड. व्ही.जी. शिंदे, आकाश मोठेराव, मनोहर पाटील, साहिल तांबोळी, विवेक वाघमारे, दगडूू माने, चांदसाब शेख,ताजोद्दीन शेख, शफी चौधरी यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
लातूर जिल्ह्यात आम आदमी पक्ष नव्याने घेणार उभारी
