• Sat. Feb 7th, 2026

1 जानेवारी, 2024 या आर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त कार्यक्रम

Byjantaadmin

Jul 14, 2023

1 जानेवारी, 2024 या आर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त कार्यक्रम

सर्व पात्र नागरीकांनी छायाचित्र मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत अर्ज भरुन आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदवावे-  जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांचे आवाहन

लातूर दि.14(जिमाका):- लातूर जिल्ह्यातील दि. 1 जानेवारी 2024 रोजी 18 वर्ष पूर्ण करणारे नागरिक व अद्याप मतदार म्हणून नोंदणी केली नसेल अशा सर्व पात्र नागरीकांनी छायाचित्र मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत विहित नमुन्यातील अर्ज भरुन (आवश्यक कागदपत्रासह) आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदवावे, असे अवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केले आहे.

या कार्यक्रमांतर्गत दि. 1 जून, 2023 ते दि. 16 ऑक्टोबर, 2023 पर्यंत पूर्व पुनरिक्षण कार्यक्रम  भारत निवडणुक आयोगाने निर्धारीत केला आहे. या पुनरिक्षण कार्यक्रमानुसार दिनांक 17ऑक्टोबर, 2023 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून अंतिम मतदार यादी दि. 5 जानेवारी, 2024 रोजी प्रसिद्ध होणार आहे. दि. 1 जानेवारी, 2024 रोजी 18 वर्ष पूर्ण करणारे नागरिक मतदार म्हणून नोंदणीस पात्र होणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही अथवा आपण अद्याप मतदार म्हणून नोंदणी केली नसेल अशा नागरिकांना छायाचित्र मतदार यादींच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत आपले नाव मतदार म्हणून नोंदवता येणार आहे.

नागरीकांना आपले नाव मतदार यादीत तपासण्यासाठी  https://ceoelection.maharashtra.gov.in/search या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा Voter Helpline App या मोबईल अँप चा वापर करावा. तसेच, यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेली मतदार यादी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.लातूर जिल्ह्यातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) हे दि. 21 जूलै 2023 ते दि. 21 ऑगस्ट 2023 या दरम्यान घरोघरी भेटी देणार आहेत. मतदार नोंदणी न झालेले पात्र नागरीक संभाव्य मतदार, मयत, कायमस्वरुपी स्थलांतरीत व अस्पष्ट फोट असणारे मतदार यांचे सर्वे करणार आहेत. या संदर्भात ERO/AERO यांचे आज जिल्हा निवडणूक अधिकारी लातूर तर्फे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. सर्व मतदारसंघामध्ये SSR-2024 चे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचे प्रशिक्षणास सुरुवात झाली आहे.

या मतदार यादीमध्येही आपले नावाची तपासणी करता येईल. जिल्ह्यातील सर्व मान्यता प्राप्त राजकीय पक्षांना मतदान केंद्रस्तरीय सहायक (BLA) यांना या मोहिमेस उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आलेले आहे.या कार्यक्रमांतर्गत लातूर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व मतदान केंद्र येथे नागरीकांकडून नाव नोंदणीसाठी विहित नमुन्यातील अर्ज स्विकारले जातील. तसेच मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी किंवा आपल्या नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी आपणास https://www.nvsp.in,Voter Helpline App (Mobile App). https://voterportal.eci.gov.in संकेत स्थळाला भेट देता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *