भारतरत्न इंदिरा गांधी मनपा शाळा क्र. ०५ आनंदनगर, लातूर येथे आज वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.हा कार्यक्रम “ग्रीन लातूर वृक्ष टीम” व “मनपा शाळा क्रं ०५” च्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आला, यात उंच वाढणारी व सुगंधी फुलाची आकाश मोगऱ्याची ४२ मोठी वृक्ष लावण्यात आली. वृक्षारोपणपूर्वी शाळेतील मुले,पालक, शिक्षक, ग्रीन लातूर वृक्ष टिम च्या सर्व सदस्यांनी हातात वृक्ष घेऊन “झाडे लावा झाडे जगवा” या घोषणा देत दिंडी काढण्यात आली.
याप्रसंगी ग्रीन लातूर वृक्ष टीम च्या सर्व सन्माननीय सदस्यांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच डॉ. पवन लड्डा यांनी मुलांना व शिक्षक कर्मचाऱ्यांना इको ब्रिक्स बनवण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले व हि शाळा भविष्यात “आकाशमोगरा शाळा” म्हणून ओळखली जाईल असे मत ऍड वैशाली यादव यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी ग्रीन लातूर वृक्ष टीमचे डॉ. पवन लड्डा, पद्माकर बागल, वैशालीताई यादव, सुलेखा कारेपूरकर, राहुल माने, नागसेन कांबळे, ओमकार सदरे, पांडुरंग बोडके, रामा पाटील, विजय मोहित,दयाराम सुडे,भराटे सर, देशमुख सर, हर्षदा बाच्चेपल्लीकर तसेच, मा. शिक्षणाधिकारी श्री.जाधव साहेबराव, रघुनाथ मदने (जनसेवक फाउंडेशन), सुनील कांबळे (SI मनपा लातूर), उमेश कांबळे (संपादक द सरफरोश), आळंद सर, बिजापूरे सर, तसेच इतर मनपा शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या छोटेखानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पांचाळ सर, प्रास्ताविक श्री. शिंदे सर, आभारप्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री. काळे सर यांनी केले. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षिका श्रीम. दौंड मॅडम व श्रीम राजेगावकर मॅडम यांनी मेहनत घेतली.