• Tue. Jun 24th, 2025

राज्याचे नवनियुक्त मंत्री संजय बनसोडे यांचा उदगीर लातूर  जिल्हा दौरा

Byjantaadmin

Jul 13, 2023

राज्याचे नवनियुक्त मंत्री संजय बनसोडे यांचा उदगीर लातूर  जिल्हा दौरा

 

लातूर,दि.13(जिमाका):- राज्याचे नवनियुक्त मंत्री संजय बनसोडे  हे लातूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.

शुक्रवार  दिनांक 14 जूलै, 2023 रोजी शकुंतला निवास धन्वंतरी कॉलनी, अंबाजोगाई रोड, लातूर येथुन मोटारीने उदगीरकडे प्रयाण.सकाळी  10 वाजता मौजे डिग्रस ग्रामस्थांच्या वतीने सत्कार, सकाळी 10.15 वाजता मौजे करडखेल ग्रामस्थांच्या वतीने सत्कार सकाळी 10.30 वाजता मौजे लोहारा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार, सकाळी 11 वाजता मौजे मलकापूर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार.

सकाळी 11.15 वाजता नागरी सत्कार सोहळा समीतीच्या वतीने स्वागत (स्थळ-उषा टॉकिज जवळ, उदगीर), सकाळी 11.25 वाजता श्री.अब्दुल समद शेख यांच्या वतीने लाडुतुला कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ- डॉ. जाकीर हुसेन चौक,उदगीर),सकाळी 11.30 वाजता लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळयास अभिवादन (स्थळ- लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौक, नांदेड रोड,उदगीर),सकाळी 11.40 वाजता डॉ.जाकेर हुसेन चौक येथे अभिवादन (स्थळ- डॉ. जाकेर हुसेन चौक,उदगीर).

सकाळी 11.50 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयास अभिवादन (स्थळ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,उदगीर),दुपारी 12 वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळयास अभिवादन, (स्थळ- महात्मा गांधी गार्डन,उदगीर), दुपारी 12.15 वाजता उदागिर बाबा यांच्या  समाधीचे दर्शन (स्थळ-किल्ला, उदगीर),दुपारी 12.30 वाजता खाजा सदरोद्दीन बादशहा दर्गा येथे चादर चढविणे (स्थळ-किल्ला गल्ली परिसर,हुसेनी आलम,उदगीर),दुपारी 12.45 वाजता शामद खादरी दर्गा येथे चादर चढविणे (स्थळ- चौबारा रोड,उदगीर)

दुपारी 1 वाजता महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारुढ पुर्णाकृती पुतळयास अभिवादन (स्थळ-नगर परिषद समोर,उदगीर), दुपारी 1.10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुर्णाकृती पुतळयास अभिवादन (स्थळ- छत्रपती शिवाजी महाराज चौक,उदगीर), दुपारी 1.20 वाजता वसंतराव नाईक यांच्या पुतळयास अभिवादन (स्थळ- स्व. वसंतराव नाईक चौक,उदगीर)

दुपारी 1.35 वाजता छत्रपती राजर्षि शाहु महाराज चौक येथे अभिवादन,(स्थळ- छत्रपती शाहु महाराज चौक,उदगीर),दुपारी 1.45 वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळयास अभिवादन (स्थळ-पु.अहिल्यादेवी होळकर गार्डन, बिदर रोड,उदगीर),दुपारी 2 वाजता नागरी सत्कार सोहळा कार्यक्रमास उपस्थिती (जि.प. मैदान, उदगीर) नंतर शासकीय विश्रामगृह उदगीर येथे  राखीव व सोईनुसार मोटारीने लातूरकडे प्रयाण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *