महाराष्ट्र महाविद्यालयात एन.सी.सी. बी. आणि सी. प्रमाणपत्राचे वितरण
निलंगा: येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने बी आणि सी प्रमाणपत्र वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके हे उपस्थीत होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र शिक्षण समितीचे सचिव मा. श्री बब्रूवान सरतापे हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करीत असताना त्यांनी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक करून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. माधव कोलपुके यांनी विद्यार्थांना या प्रमाणपत्राचा उपयोग देश सेवेसाठी करावा असा संदेश दिला.
राष्ट्रीय छात्र सेना विभागातून बी प्रमाणपत्र परीक्षेसाठी ११ मुले व ०२ मुली असे एकूण १३ विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले तर सी प्रमाणपत्र परीक्षेत ०८ मुले व ०५ मुली असे एकूण १३ विद्यार्थ्यांनी यश मिळविले.या सर्व विद्यार्थ्यांना या प्रसंगी प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले. या प्रमाणपत्र वितरण समारंभाचे प्रास्ताविक एन.सी.सी.केअर टेकर ऑफिसर डॉ. विठ्ठल सांडूर यांनी केले. तर आभार डॉ. सचिन बसुदे यांनी व्यक्त केले. यावेळी मेजर डॉ. चंद्रकुमार कदम, स्टाफ सचिव डॉ. भगवान वाघमारे, डॉ. भास्कर गायकवाड, डॉ. धनंजय जाधव, डॉ. गोपाळ मोघे व महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.