• Sat. Feb 7th, 2026

तनुजा शिंदे गाजवते लावणीचा लातूर पॅटर्न कलर्स मराठी वाहिनीवर

Byjantaadmin

Jul 12, 2023

तनुजा शिंदे गाजवते लावणीचा लातूर पॅटर्न कलर्स मराठी वाहिनीवर
लातूर, दि.१२ – ढोलकीच्या तालावर हा कार्यक्रम कलर्स मराठी वाहिनीवर दर शनिवार आणि रविवार सायंकाळी नऊ वाजता प्रदर्शित होतो या कार्यक्रमात महाराष्ट्रातून बारा लावण्यवतीची निवड करण्यात आली आहे.
यामध्ये मराठवाड्यातून फक्त लातूरची कन्या तनुजा शिंदे ची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे परीक्षण प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील, अभिनेत्री क्रांती रेडकर, दिग्दर्शक अभिजीत पानसे करीत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून तनुजाचे कौतुक करण्यात येत आहे.
यापूर्वी तनुजाचे दोन मराठी चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत, (१-छंद प्रीतीचा २) हरी ओम) नृत्य स्पर्धेमध्ये तीनशे हून अधिक पारितोषिके पटकावली आहेत. नृत्य क्षेत्रातमहाराष्ट्र भूषण पुरस्कारआणि लातूर रत्न पुरस्कारमिळविला आहे त्याचबरोबरइंडिया की दुल्हनियाया मॉडलिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. मिस रंगरेज २०२२ हे टायटल मिळविले आहे. वेगवेगळ्या नाटकांमध्ये तनुजाने भूमिका पार पाडल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *