• Wed. Jun 25th, 2025

रुपाली चाकणकर यांच्याविषयी सोशल मीडियावर अश्लील मजकूर; सात जणांवर गुन्हे दाखल

Byjantaadmin

Jul 12, 2023

ष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित गट) नेत्या रूपाली चाकणकर यांच्याविरोधात समाज माध्यमांमध्ये अश्लील मजकूर प्रसिद्ध केला, तसेच चाकणकरांचे फोटो मॉर्फ केल्याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पुण्यामध्ये सायबर क्राइम अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

रूपाली चाकणकर या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. नुकतीच चाकणकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) महिला आघाडी प्रदेशाध्यक्षपदावर त्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. दरम्यान चाकणकर यांच्याबद्दल समाज माध्यमांमध्ये अश्लील आशयाचे मजकूर काही जणांकडून प्रसिद्ध करण्यात आले होते.दरम्यान, या प्रकरणात पोलिसांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. याबाबत सायबर क्राइम अन्वये संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ॲड. विजयकुमार साखरे या नावाने समाज माध्यमावर एक खाते आहे. या खातेधारकाचे केलेल्या पोस्ट वर आणखी काही जणांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.सदर बाबRUPALI CHAKANKAR यांच्या लक्षात लक्षात आल्यावर, त्यांनी तातडीनेCYBER POLICE डे धाव घेतली आहे. आता या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सायबर पोलिसांनी एकूण सात जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *