नाशिक:-गद्दार गेले मात्र, नाशिकमध्ये सामान्य जनता शिवसेनेसाेबत आहे. त्यामुळे शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना आस्मान दाखवा, त्यांना पाडण्यासाठी सर्वांनी एकजुट करावी असा मंत्र देत पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आगामी लाेकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले. गाैण खनिज मंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गाेडसे व आमदार सुहास कांदे यांच्या विधानसभा मतदारसंघात ताेडीस ताेड उमेदवार देण्यासाठी चाचपणी करण्याच्याही सुचना त्यांनी दिल्या.
लोकसभेसाठी तयारी जोरात
शिवसेनेला साेडचिठ्ठी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना साेबत घेत भाजपासाेबत नवीन सरकार बनवले. पाठाेपाठ केंद्रातील शिवसेनेचे 12 खासदार आपल्याकडे खेचून आणले. त्यानंतर शिवसेना काेणाची यावरून सर्वाच्च न्यायालय तसेच निवडणुक आयाेगाकडे सुनावणीही सुरू आहे. एवढेच नव्हे तर, अंधेरी विधानसभा पाेटनिवडणुकीमुळे सेनेचे दाेन तुकडे हाेवून एकी बाळासाहेबांची सेना तर दुसरी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असे भाग पडले आहे. थाेडक्यात शिंदे विरूद्ध ठाकरे हा संघर्ष टाेकाला गेला असून ही बाब लक्षात घेता सव्वा वर्षावर येवून ठेपलेल्या लाेकसभा निवडणुकीसाठी ठाकरे यांनी तयारी सुरू केली आहे.
गद्दारांना धडा शिकवा
लाेकसभेबराेबरच विधानसभेच्या निवडणुका हाेण्याची शक्यता लक्षात घेत ठाकरे यांनी नाशिक व दिंडाेरी या दाेन्ही लाेकसभा मतदारसंघाच्या बैठका घेतल्या. या बैठकीत त्यांनी लाेकसभेच्या दाेन तर विधानसभेच्या 15 जागासंदर्भात आढावा घेतला. प्रामुख्याने उमेदवार काेण याबाबत चाचपणी केली. काेणत्याही परिस्थीतीत शिवसेनेशी गद्दारी केलेल्यांना धडा शिकवा असाही संदेश दिला. यावेळी संपर्कप्रमख भाऊसाहेब चाैधरी, दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी गटनेता विलास शिंदे, वसंत गिते आदी उपस्थित हाेते.
गटप्रमुख, बुथप्रमुखांची नियुक्ती करा
महापालिका निवडणुक जानेवारी किंवा फेब्रुवारीत हाेवू शकते. निवडणुक असाे वा नसाे संघटनेला बळकटी देण्यासाठी रिक्त असलेल्या गटप्रमुख व बुथप्रमुखांच्या जागा भरा अशाही सुचना केल्या.
मतदार नाेंदणीही वाढवा
ठाकरे यांनी सदस्य नाेंदणीचा आढावा घेतल्यानंतर केवळ 30 हजार नवीन सभासद नाेंदवले गेल्याचे समाेर आले. त्यातही शहराची कामगिरी चांगली असून ग्रामीणमध्ये प्रतिसाद कमी असल्यामुळे अजून 30 हजार सभासद नाेंदणी करा अशा सुचना केल्या. 1 नाेव्हेंबर ते 11 डिसेंबर यादरम्यान मतदार नाेंदणीसाठी माेहीम असून या माेहीमेत जास्तीजास्त मतदार नाेंदवण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त व माजी नगरसेवकांनी प्रयत्न करावे असेही आदेश दिले.