• Fri. Feb 6th, 2026

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली! शिंदे गटाला मिळणार न्याय?

Byjantaadmin

Jul 7, 2023

गेल्या वर्षभरापासून शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. शिंदे गटातील आणि भाजपचे अनेक आमदार मंत्रिपदाकडे आस लावून बसले आहेत. अशातच आता राष्ट्रवादीचे ९ आमदार या महायुतीमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे अनेक इच्छुक आमदारांच्या मंत्रीपदाला कात्री लागण्याची शक्यता आहे.सत्ताधाऱ्यांकडूनही वारंवार मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचं सांगितलं जात आहे. येत्या आठवड्यात विस्तार होईल असं सांगितलं जात असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड केलं आणि सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे त्यांच्यासह 8 सहकाऱ्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. तर आता भाजप-शिवसेना- अजित पवार गट यांच्यात मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती आहे.

तर युती सरकारच्या पुढील विस्ताराची तारीख ठरल्याची माहीती आहे. ९ जुलै किंवा १० जुलै रोजी उर्वरित मंत्रीमंडळाचा विस्तार करण्याचा युती सरकारचा मानस आहे. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर  मंत्रिमंडळ विस्तार होत असताना शपथ घेणाऱ्या मंत्र्यांसाठी मिळालेल्या संबधित खात्यांची माहिती असावी याअनुशंगाने आता हालचालींना वेग आलेला आहे.मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत काल रात्री मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची नंदनवन या शासकिय निवासस्थानी बैठक झाली आहे. उर्वरित मंत्रीमंडळाच्या विस्तारात भाजप व शिवसेनेच्याच आमदारांचा शपथविधी होणार असल्याची माहिती साम टीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *