• Fri. Jun 27th, 2025

काँग्रेसच्या जिल्हा ग्राहक सेल च्या अध्यक्षपदी सोनू डगवाले यांची निवड

Byjantaadmin

Jul 7, 2023
काँग्रेसच्या जिल्हा ग्राहक सेल च्या अध्यक्षपदी सोनू डगवाले यांची निवड
माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते दिले नियुक्ती पत्र
लातूर;- .लातूर जिल्हा काँग्रेस ग्राहक सेलच्या जिल्हाध्यक्षपदी सोनू डगवाले यांच्या नियुक्तीचे  पत्र राज्याचे माजी मंत्री प्रदेश काँग्रेसचे जेष्ठ नेते सहकार महर्षी  दिलीपराव देशमुख  यांच्या हस्ते गुरुवारी देण्यात आले  यावेळी  लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे,प्रदेश काँग्रेस सचिव अभय साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती
  यावेळी सेवादलाचे  रमेश सूर्यवंशी , सोशल मीडिया सेलचे  प्रवीण सूर्यवंशी प्रशिक्षण व मूल्यमापन सेलचे ओमप्रकाश झुरळे , रेणा साखर कारखान्याचे संचालक प्रवीण पाटील, ओबीसी सेलचे एकनाथ पाटील, अनुसूचित सेलचेअँड बाबासाहेब गायकवाड, रोजगार व स्वंरोजगार सेलचे मुकेश राजमाने, सेवा दलाचे सुपर्ण जगताप तालुका काँग्रेस अध्यक्ष सुभाष घोडके, रेणा चे संचालक संभाजी रेड्डी, इसरार सगरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांनी नूतन ग्राहक सेल चे जिल्हाध्यक्ष सोनु डगवाले यांना शुभेच्छा देवुन ग्राहकांचे प्रश्न  सोडवावे त्यांचे हक्क  यासंदर्भात अधिक जनजागृती करावी करावे जेणेकरून समाजातील लोकांना त्याचा फायदा होईल असे यावेळी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *