• Sun. Jun 29th, 2025

काल अजितदादांच्या शपथविधीला हजर असलेले राष्ट्रवादीचे आमदार आज शरद पवारांच्या गाडीत!

Byjantaadmin

Jul 3, 2023

सातारा, 3 जुलै :  मोठी बातमी समोर येत आहे. काल अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड केलं. त्यांनी विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा देऊन मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. मात्र काल अजित पवार यांच्यासोबत मंत्रिपदाची शपत घेताना जे आमदार हजर होते, त्यातीला काही आमदार पुन्हा एकदा शरद पवार यांच्या गाडीमध्ये दिसून आले आहेत.

काल अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीला राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील, शशिकांत शिंदे आणि जुन्नरचे आमदार अतुल बेनके हे देखील उपस्थित होते. मात्र आज हे तीनही आमदार शरद पवार यांच्यासोबत दिसून येत आहेत. राष्ट्रवादीमध्ये झालेल्या बंडानंतर आज शरद पवाराचं जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू आहे. शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी कराडला रवाना झाले आहेत. यावेळी त्यांचं आमदार शशिकांत शिंदे यांनी साताऱ्यात भव्य स्वागत केलं. शशिकांत शिंदे यांच्यासोबत जुन्नरचे आमदार अतुल बेनके आणि मकरंद पाटील हे देखील शरद पवार यांच्या गाडीमध्ये दिसून आले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *