• Fri. Jun 20th, 2025

डॉक्टर्स डेच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने कोविड योद्धा डॉक्टरांचा सन्मान

Byjantaadmin

Jul 1, 2023

डॉक्टर्स डेच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने कोविड योद्धा डॉक्टरांचा सन्मान
लातूर : डॉक्टर्स डेचे औचित्य साधून बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड योद्धा डॉ. प्रताप लेंडाळ यासह अन्य तज्ज्ञ डॉक्टर्स, वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
या अभिनव उपक्रमाचे आयोजन शिवसेना जिल्हा प्रमुख एड. बळवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शहर प्रमुख दिनेश बोरा, संदीपमामा जाधव यांनी केले होते.
आज डॉक्टर दिनाचे औचित्य साधून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे एमडी पदवीचे शिक्षण घेणारे डॉ. प्रताप लेंडाळ यांनी त्यांच्या वैद्यकीय प्रशिक्षण काळातील पहिल्या व दुसऱ्या वर्षाच्या कार्यकाळात आलेल्या कोविड आजारात रुग्णांची सेवा करताना दिवसाचे १८ – १८ तास काम करून केवळ ६ तास झोप , ती पण कोविड वार्डातच घेत असत. अशा कोविड योद्धा डॉक्टरचे आज पर्यंत कोणीही दखल घेतली नव्हती. पण शिवसेना शहर प्रमुख दिनेश बोरा यांच्या नियोजनाने आज आपत्कालीन परिस्थितीत सेवा देणारे डॉक्टर सन्मानाने वंचित राहू नये व त्यांचे प्रोत्साहन वाढावे , ह्या उद्देशाने शिवसेना जिल्हाप्रमुख एड. बळवंतभाऊ जाधव यांच्या हस्ते त्यांचा शाल व बाळासाहेबांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील अधीक्षक डॉ. सचिन जाधव, निवासीय डॉ. सौ. कांचन जाधव यांचाही पुष्पगुच्छ व लेखणी देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख दिनेश बोरा, शिवसेना शहर संघटक संदीप मामा जाधव, एड. अर्जुन जाधव, उपशहर प्रमुख विजयकुमार कांबळे, वैद्यकीय मदत कक्ष मराठवाडा सह समन्वयक सोमनाथ जाधव, जिल्हा कार्यालय प्रमुख संजय मुरगे, विभाग प्रमुख शंकर कलवले, शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *