• Tue. Apr 29th, 2025

भाजपला मोठा धक्का! आमदार सीमा हिरे यांचे बंधू काँग्रेसवासी

Byjantaadmin

Jun 29, 2023

आगामी निवडणुकांसाठी भाजपने रणशिंग फुंकले असून, जोरदार तयारी सुरू केलेली असताना शहरात भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. नाशिक पश्‍चिमच्या आमदार सीमा हिरे यांचे बंधू भालचंद्र पाटील यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला आहे.प्रदेशाध्यक्ष,नाना पटोले यांच्या उपस्थितीत शहराध्यक्ष आकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली श्री. पाटील यांच्यासह विविध पक्षांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केला आहे. प्रा. यशवंत पाटील आणि त्यांचे पुत्र भालचंद्र पाटील हे यशवंत क्लासेसचे संचालक असून, दोघेही काँग्रेस विचारसरणीचेच आहेत. देशात सध्या असलेले वातावरण बघता काँग्रेस पक्षाची गरज असल्यानेच आपण पक्षात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला, असे भालचंद्र पाटील यांनी या वेळी सांगितले.

लोकसभा आणि विधानसभांच्या पार्श्‍वभूमीवर BJP ने जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्ष संघटन बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. इतकेच नव्हे, तर मतदारसंघ चांगल्या पद्धतीने बांधण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. त्यादृष्टीने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत सभादेखील होणार आहे.असे असताना भाजपच्या निष्ठावान असलेल्या आमदार हिरे यांचे बंधू भालचंद्र पाटील यांच्यासह गुड्डू गवई, सुमित सोनवणे यांनी कार्यकर्त्यांसहकाँ ग्रेसममध्ये प्रवेश केला. मुंबईत झालेल्या या प्रवेश सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले की, आगामी काळात काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यावर लक्ष दिले जाईल.पक्ष प्रवेश करणाऱ्यांना लवकरच नवीन जबाबदारी दिली जाईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी शहराध्यक्ष छाजेड यांनी शहर काँग्रेसच्या कार्याचा अहवाल सादर केला. तसेच आगामी काळात नाशिक शहरातील विविध पक्षांतील बडे नेते कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले. प्रदेशाध्यक्ष पटोले, तसेच जिल्हा प्रभारी राजू वाघमारे यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.पक्षाचे सरचिटणीस प्रमोद मोरे, देवानंद पवार, सिडको ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष विजय पाटील, अल्तमश शेख, गौरव सोनार, संतोष ठाकूर, कल्पेश जेजुरकर, विवेक कडवे, दिलीप सिंग, अण्णासाहेब कटारे, राहुल जानराव, अनिल शिंदे, संदीप भालेराव आदी उपस्थित होते. दरम्यान, पाटील कुटुंब हे पहिल्यापासूनच काँग्रेस विचारसरणीचेच असल्याचे हिरे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed