16 जून 2024 रोजी 17 व्या लोकसभेचा (Lok sabha) कार्यकाळ पूर्ण होणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून (Election Commission of India) लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. पण लोकसभा निवडणूक 2024 मध्ये (lok sabha Election 2024) कधी होणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. 16 एप्रिलपासून देशभरात लोकसभा निवडणुका सुरु होणार आहेत का? सोशल मीडियावर सध्या निवडणूक आयोगाचं एक पत्र व्हायरल होतोय, त्यामध्ये तसा दावा केला जातोय. याच दिवशी निवडणुका होतील, असे नाही असे निवडणूक आयोगानं स्पष्ट केलेय. 18 व्या लोकसभा निवडणुकीची तारीख अद्याप निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेली नाही. पण मागील चार लोकसभा निवडणुका आणि घटनात्मक तरतुदीच्या आधारावर आपण निवडणुका कधी होऊ शकतात, याचा अंदाज बांधू शकतो.

लोकसभा निवडणुकीची तारीख कशी ठरते ?
भारताची निवडणूक आयोग स्थीर संवैधानिक संस्था आहे. निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी संविधानानुसार करण्यात आली. भारतीय संविधानाच्या कलम 324 अनुसार (निवडणूक आयोगाच्या स्वातंत्र्य आणि निःपक्षपाती कामकाजाशी संबंधित) भारतात लोकसभा, विधानसभा, राज्यसभा निवडणुकीचं आयोजन भारतीय निवडणूक आयोग (Election Commission of India) करते. देशात स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात, यासाठी भारतीय राज्यघटनेने कायमस्वरूपी आणि स्वतंत्र संस्थेची स्थापना केली. भारताच्या लोकसभा निवडणुका घेण्याची जबाबदारी या आयोगावर आहे. राज्यांमधील नगरपालिका आणि पंचायतींच्या निवडणुकासाठी भारतीय राज्यघटनेकडून स्वतंत्र राज्य निवडणूक आयोग दिला जातो.
राज्यघटनेने ठरवून दिलेल्या कालमर्यादेत निवडणुका घेणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. लोकसभा निवडणुकीची तारीख ठरवण्यातही आयोगाची भूमिका महत्त्वाची असते. प्रत्येक लोकसभेचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. या पाच वर्षांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच निवडणुका घेण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते.
घटनेने विहित केलेल्या कालमर्यादेचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी लोकसभेची तारीख ठरवताना निवडणूक आयोगाला घ्यावी लागते. त्याशिवाय तारीख ठरवताना काही नैसर्गिक परिस्थिती लक्षात ठेवावी लागते. उदाहरणार्थ, निवडणुकीच्या दिवशी त्या भागात जास्त उष्णता किंवा पाऊस नसावा ज्यामुळे मतदानावर परिणाम होईल.
देशातील कोणत्याही राजकीय पक्षाला अनुचित फायदा मिळू नये, अशी तारीख निवडावी लागते. त्याशिवाय देशभरात होणाऱ्या निवडणुका निष्पक्षपणे पार पाडता याव्यात, याची काळजी निवडणूक आयोगाला घ्यावी लागते. धार्मिक सण, राष्ट्रीय सुट्ट्या, विशेष परीक्षांच्या तारखा, सुरक्षा दलांची उपलब्धता यांचाही विचार निवडणूक आयोगाला करावा लागतो.
मतदानाच्या किती दिवस आधी निवडणुकीची घोषणा –
मागील चार लोकसभा निवडणुका (2019, 2014, 2009 आणि 2004) पाहिल्यास, निवड आयोग 40 ते 50 दिवस आधी देशातील लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करतं. म्हणजे, तेव्हापासून देशात आचारसंहिता लागू होते.
2019 लोकसभा निवडणुका 11 एप्रिल ते 19 मे यादरम्यान सात टप्प्यात झाल्या होत्या. निवडणूक आयोगानं मार्च महिन्याच्या सुरुवातीचा तारखेची घोषणा केली होती.
पहिला टप्पा – 11 एप्रिल 2019 (91 जागा, 20 राज्य)
दुसरा टप्पा – 18 एप्रिल 2019 (95 जागा 13 राज्य)
तिसरा टप्पा – 23 एप्रिल 2019 (117 जागा, 15 राज्य)
चौथा टप्पा – 29 एप्रिल 2019 (71 जागा, 9 राज्य)
पाचवा टप्पा – 6 मे 2019 (51 जागा, 7 राज्य)
सहावा टप्पा – 12 मे 2019 (59 जागा 7 राज्य)
सातवा टप्पा 19 मे 2019 (59 जागा, 8 राज्य)
निवडणुकीचा निकाल – 23 मे रोजी 2019
2014 आणि 2009 मध्ये निवडणणूक आयोगानं मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा केली होती. 2009 मध्ये 16 एप्रिल ते 13 मे यादरम्यान सात टप्प्यात निवडणुका झाल्या होत्या. 2004 मध्ये थोड्या आधी निवडणुका झाल्या होत्या. 29 फेब्रुवारी रोजी घोषणा झाली होती.
मागील चार लोकसभा निवडणुकेवरुन मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात यंदाच्या लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
2024 लोकसभा निवडणुका कधी होणार ?
लोकसभा निवडणुका 2024 च्या तारखांची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. मागील चार लोकसभा निवडणुका पाहिल्यास एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच सुरु झाल्या आहेत. एप्रिल ते मे यादरम्यान सात टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे. 2019 मध्ये 11 एप्रिलपासून निवडणुका पार पडल्या होत्या. 2014 मध्ये सात एप्रिलपासून, 2009 मध्ये 16 एप्रिलपासून तर 2004 मध्ये 20 एप्रिलपासून निवडणुका पार पडल्या होत्या.
2024 मध्ये 18 लोकसभा निवडणुकीत एप्रिल ते मे यादरम्यान मतदान प्रक्रिया पार पडेल. मार्च ते मे यादरम्यान देशभरातील हवामानही व्यवस्थित मानलं जातं. निवडणुका पाच ते सात टप्प्यात होऊ शकतात.
तुमच्या राज्यात कोणत्या टप्प्यात होऊ शकतं मतदान ?
मोठं राज्य आणि जास्त सीट असणाऱ्या राज्यात अनेक टप्प्यात मतदान होतं. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल यासारख्या राज्यात दोन ते तीन टप्प्यात मतदान होतं. छोट्या राज्यात एक अथवा दोन टप्प्यात निवडणका पार पडतात, उदा. दिल्ली, अरुणाचलप्रदेश,त्रिपुरा यासारख्या राज्यांचा यामध्ये समावेश आहे.
मागील निवडणुकीच्या डेटाच्या आधारावर पाहूयात, कोणत्या टप्प्यात कोणत्या राज्यात मतदान होऊ शकतं ?
- पहिला टप्पा- जम्मू आणि कश्मीर, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिजोरम, नगालँड, ओडिशा, सिक्किम, तेलंगाणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अंडमान, लक्षद्वीप.
- दूसरा टप्पा- आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगढ, जम्मू आणि कश्मीर, कर्नाटक, महाराष्ट्र, मणिपूर, ओडिशा, तमिलनाडु, त्रिपुरा, यूपी, पश्चिम बंगाल आणि पुडुचेरी.
- तिसरा टप्पा- आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, गोवा, जम्मू आणि कश्मीर, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, दादरा आणि नगर हवेली, दमन आणि दीव.
- चौथा टप्पा – बिहार, उत्तर प्रदेश, जम्मू आणि कश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश, maharashtra, ओडिशा, राजस्थान, पश्चिम बंगाल.
- पाचवा टप्पा- राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, जम्मू और कश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश.
- सहावा टप्पा- बिहार, हरियाणा, झारखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली-एनसीआर.
- सातवा टप्पा- उत्तराखंड, झारखंड, मध्य प्रदेश, पंजाब, बिहार, पश्चिम बंगाल, चंडीगढ़, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश.
लोकसभा निवडणुकीचा निकाल कधी लागणार ?
अखेरच्या टप्प्याचं मतदान झाल्यानंतरत आठडाभराच्या आत लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होते. 2019 मध्ये 23 मे रोजी निकाल घोषित झाला होता. 2014 आणि 2009 मध्ये 16 मे रोजी निकाल घोषीत केला होता. 2004 मध्ये 13 मे रोजी निकाल जाहीर करण्यात आला होता. मागील चार निवडणुका पाहिल्यास 13 मे ते 23 मे यादरम्यान लोकसभा निवडणुकीच्या निकाल जाहीर होऊ शकतो. मे महिन्यात मतमोजणी झाल्यानंतर कुणाचं सरकार येणार? हे स्पष्ट होईल.
आचारसंहिता कधी लागू होणार ?
- लोकसभा अथवा विधनसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर त्याच दिवसांपासून देशात अथवा त्या राज्यात आचारसंहिता लागू करण्यात येते.
- 1962 च्या सार्वत्रिक निवडणुकीवेळी निवडणूक आयोगाने प्रथमच सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना आचारसंहिता वितरीत केली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आचरसंहिता लागू शकते.
- आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्य अथवा केंद्र सरकार कोणताही घोषणा करु शकत नाही, अथवा नवीन विधेयक सादर केले जाऊ शकत नाही. राजकीय पक्ष किंवा उमेदवार त्यांच्या प्रचारासाठी सरकारी संसाधनांचा वापर करू शकत नाहीत. राजकीय पक्ष मतदारांना मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करू शकत नाहीत.
- आदर्श आचरसंहितानुसार, कोणताही पक्ष अथवा उमेदवार परस्पर द्वेष निर्माण करणारी किंवा दोन जाती आणि समुदायांमध्ये तेढ निर्माण करणारी कोणतीही कृती, वक्तव्य करू शकत नाही. मस्जिद, चर्च, मंदिरे किंवा इतर प्रार्थनास्थळे निवडणूक प्रचारासाठी व्यासपीठ म्हणून वापरता येणार नाहीत.
- मतदारांना लाच देणं, धमकावणं या काळात केल्यास आचारसंहितेचा भंग मानला जाईल. मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या आत प्रचार करण्यासही मनाई आहे. जर कोणता उमेदराने या नियमांचं उल्लंघन केल्यास त्याचं नामांकन रद्द केलं जाऊ शकते. अटक झाल्यास सहजासहजी जामीन मिळत नाही.