• Wed. Apr 30th, 2025

ट्वेन्टीवन शुगर्स. ली, चे ५ लाख मे. टन ऊसाचे विक्रमी गाळपशेतकऱ्यांना पहीला हप्ता २ हजार ५०० रू अदा

Byjantaadmin

Jan 26, 2024

•ट्वेन्टीवन शुगर्सची ऊसगाळपात आघाडी
•कार्यक्षेत्रात आधुनीक ऊसविकासाला चालना
•ऊसशेती यांत्रीकीकरणास प्राधान्य
•ऊसविकास संशोधन आणि विकास कार्यप्रणाली
प्रतिनिधी २६ जानेवारी २०२४ : टवेन्टिवन शुगर्स, सायखेडा ता. सोनपेठ जि. परभणी येथील साखर कारखान्याकडून चालू गळीत हंगाम २०२३-२०२४ साठी गाळप झालेल्या ऊसाला २ हजार ५०० रू रक्कम अदा करण्यात आली आहे. तर अंतीम ऊस्दर प्रतिटन २ हजार ७०० रूपये देण्याचा निर्णय झाला असून सबंधीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर गाळप झालेल्या ऊस बीलाची उर्वरीत रक्कम प्रतिटन रूपये २०० लवकरच अदा करण्यात येणार आहे. Bमराठवाडयातील परभणी, बीड जिल्हयातील विशेषत: सोनपेठ, पाथरी, पालम, गंगाखेड, पूर्णा, परळी, माजलगाव, धारूर या भागातील ऊसउत्पादक शेतकरी, शेतीपूरक व्यवसायीक, बेरोजगार युवकांसाठी या भागात साखर उदयोग सुरू करणे गरजेचे होते. राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी हा विचार करून टवेन्टिवन शुगर्स देवीनगर सायखेडा येथे सुरू केला. हा कारखाना प्रामुख्याने परभणी व बीड जिल्हयातील शेतकऱ्यांच्या ऊसाचे गाळप व्हावे, साखर कारखानदारीच्या माध्यमातून त्यांच्या जीवनात आर्थिक बदल व्हावा यासाठी निर्णय घेतला आहे. परभणी जिल्हयात टवेन्टिवन शुगर्स कारखाना नजीक ऊसाचे क्षेत्र मोठया प्रमाणात आहे. पण शेतकऱ्यांना ऊसाचे गाळप वेळेवर करेल आणि शाश्वत ऊसदर याची हमी नव्हती. टवेन्टिवन शुगर्स कारखाना सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना ऊसाचे
गाळप वेळेवर करणारा हक्काचा कारखाना मिळाला. शेतकऱ्यांचा ऊस गाळपावीना शिल्लक राहू नाही याची हमी मिळाली आहे.

ट्वेन्टीवन शुगर्सची ऊस गाळपात आघाडी

विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी साखर कारखाना परीवारात हा साखर कारखाना दाखल झाल्या नंतर पहील्या हंगामापासूनच सर्व हंगामात ऊसाचे गाळप चांगले झाले आहे. ऊसउत्पादक शेतकऱ्यांना या माध्यमातून ऊसदराची शाश्वती मिळाली आहे. टवेन्टिवन शुगर्स, सायखेडा कारखान्याचा चौथा गळीत हंगामाची यशस्वीपणे वाटचाल सुरू आहे. पहील्या
गळीत हंगामानंतर साखर कारखान्याचे आधुनीकीकरण आणि विस्तारीकरण करण्यात आलआहे. कारखान्याची गाळप क्षमता वाढल्याने अधिकात अधिक ऊसाचे वेळेवर गाळप करणे सदया शक्य झाले आहे. गळीत हंगाम प्रगतीपथावर असून या हंगामात ५ लाख १६ हजार ८१७ मे. टन पेक्षा अधिक ऊसाचे गाळप झाले आहे.

कार्यक्षेत्रात विविध योजनातून आधुनीक ऊसविकासाला चालना

ट्वेन्टीवन शुगर्स कार्यक्षेत्रात पाण्याची उपलब्धता चांगली आहे. शेतजतीनीचा पोत चांगला आहे आणि शेतकरी कष्टाळू आणि प्रयोगशील आहे. यामुळे या ऊसउत्पादकांना आधुनीक ऊसशेती अवगत करण्यासाठी कारखान्याकडून ऊसविकास संशोधन आणि मार्गदर्शन कार्यप्रणाली राबविण्यात येणार आहे. कारखान्याकडून ऊसविकास मेळावा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, ऊसाचे विविध वाणाची लागवड व्हावी याकरीता टिश्यू कल्चर रोप पुरविण्यासाठी नर्सरी सुरू केली आहे, चांगल्या प्रतीच्या ऊसाची लागवड वाढावी यासाठी आडसाली योजना सुरू केली आहे. पथदर्शी शेतकऱ्यांची निवड करून ५० एकर क्षेत्रावर संस्कार प्लॉट योजना राबवीली आहे. या सर्व योजनांना सभासद व ऊसउत्पादकांकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे.

ऊस शेती यांत्रीकीकरणास प्राधान्य

साखर उदयोगासमोर ऊस लागवड, ऊस तोडणी, ऊस वाहतूक, कारखाना गाळप प्रक्रीयेसाठी साखर कारखाने आणि ऊसउत्पादक शेतकऱ्यांनाही शेतीसाठी मजूरांची कमतरता भासत आहे. यातून ऊसशेती मधील उत्पादन खर्च वाढत आहे. यावर उपाय योजना म्हणून ट्वेन्टीवन शुगर्स ऊसशेती यांत्रीकीकरणाला प्राधान्य देणार आहे. ऊसशेतीमध्ये हार्वेसटर, मीनी
ट्रॅक्टर, ऊस लागवड यंत्र माध्यूतातून यांत्रीकीकरणास चालना देण्यात येणार आहे. ऊसाची उपलब्धता आणि गुणवत्ता गळीत हंगाम सुरू होण्या अगोदरच समजण्यासाठी डीजटलायझेशन आणि मॅपींग कार्यप्रणाली विकसीत करण्यात येणार आहे.
सदया आसवनी प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून ऊसउत्पादक शेतकऱ्यांना येणाऱ्या काळात चांगला भाव देता यावा यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. या गळीत हंगामात गाळप झालेल्या ऊसाला पहीला हप्ता प्रतिटन २ हजार ५०० रूपये अदा करण्यात आले आहेत. तर लवकरच उर्वरीत रू २०० प्रति टन प्रमाणे रक्कम अदा करण्यात येणार आहे. यामुळे या भागातील सभासद, ऊसउत्पादकांनी आपला जास्तीत जास्त ऊस ट्वेन्टीवन शुगर्सला दयावा असे आवाहन, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी
केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed