शेतकऱ्यांनी कमी पाण्यात अधिक उसउत्पादन घ्यावे तांत्रीक मार्गदर्शन आणि सहकार्य कारखान्याच्या वतीने करण्यात येईल
विलास साखर कारखान्याच्या २१ वी अधिमंडळाच्या सभेत माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांची ग्वाही शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी, कर्ज, तंत्रज्ञान प्रशिक्षण आणि इतर
सर्वप्रकारचे सहकार्य केले जाईल. साखर कारखाना वर्षभर म्हणजे सलग ३६५ दिवस चालवा या दृष्टीने उपपदार्थ निर्मिती केली जाईल. वीज, बायोगॅस आणि इथेनॉलवर चालणारी वाहने तयार होत असल्यामुळे कारखान्यात सर्वच प्रकारच्या उच्च दर्जाची इंधन निर्मिती केली जाईल. कारखान्यात लागणाऱ्या मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या
मुलांना प्राधान्याने प्रशिक्षित करण्याची योजना राबवली जाईल. कारखान्याचे सभासद, कर्मचारी, कामगार या सर्व घटकांना कौटुंबिक विमा संरक्षण देण्यात येईल.
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी घालून दिलेली लक्ष्मण रेषा आणि आदरणीय दिलीपराव देशमुख यांची शिस्त या गोष्टीचा विचार करून जिल्ह्यातील सहकारी संस्थांचा विस्तार आणि कारभार केला जाईल.मांजरा परिवारातील साखर कारखान्यात सकारात्मक स्पर्धा सुरू ठेवून शेतकरी आणि ग्रामीण भागाचा विकास साधला जाई लातूर आणि परिसरातील दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. चाटा, भोयरा परिसरात तिसरा टप्प्यातील लातूर एमआयडीसीच्या विस्तारासाठी प्रयत्न केले जाते. माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुखयांच्या स्मारकाचेलोकार्पण आणि प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन लवकरच करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी बोलताना दिली.
लातूर (प्रतिनिधी)आपल्याकडे नेममीच निर्माण होणारी अवर्षणाची परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून उसाचे एकरी अधिकाधिक उत्पादन
घ्यावे असे आवाहन करून शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी, आवश्यक असणारेकर्ज, तंत्रज्ञान प्रशिक्षण आणि इतर सर्वप्रकारचे सहकार्य साखर कारखान्यामार्फत केले जाईल असे आश्वासन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दिले. लातूर तालुक्यातील निवळी येथे विलास सहकारी शेतकरी साखर कारखान्याच्या अध्यक्षा आदरणीय आई वैशालीताई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या कारखान्याच्या २१ व्या सर्वसाधारण सभेत माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लातूर ग्रामीणचे आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव बाजुळे, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रीशैल उटगे, जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन अॅड. प्रमोद जाधव, रेणा साखर कारखान्याचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील, मांजरा कारखान्याचे माजी चेअरमन धनंजय देशमुख, ट्वेन्टीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, उपसभापती सुनील पडिले, व्हा.चेअरमन रविंद्र काळे, कार्यकारी संचालक संजीव देसाई, सर्व संचालक व मान्यवरांची उपस्थिती होती. या प्रसंगी पूढे बोलतांना माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले की, यावर्षी पून्हा अवर्षणा सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता पर्यंत सरासरीच्या ५० ते ६० टक्केच पाऊस झाला आहे. आणखी पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे. मात्र दर आठ दहा वर्षाला आपल्याकडे दुष्काळी परिस्थिती निर्माण होते अशा टंचाईच्या परिस्थितीत कमी पाण्यात एकरी अधिक उत्पादन घेणेसाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी लागणारे तंत्रज्ञान, कर्ज, मार्गदर्शन कारखान्यामार्फत यापूढे पूरवले जाणार आहेत. आपल्या कडील साखर कारखाना वर्षभर म्हणजे सलग ३६५ दिवस चालावेत या दृष्टीने उपपदार्थ निर्मिती केली जाईल. वीज, बायोगॅस आणि इथेनॉलवर चालणारी वाहने तयार होत असल्यामुळे कारखान्यात सर्वच प्रकारच्या उच्च दर्जाची इंधन निर्मिती केली जाईल. कारखान्यात लागणाऱ्या मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या मुलांना प्राधान्याने प्रशिक्षित करण्याची योजना राबवली जाईल. कारखान्याचे सभासद, कर्मचारी, कामगार या सर्व घटकांना कौटुंबिक विमा संरक्षण देण्यात येईल. माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख यांनी घालून दिलेली लक्ष्मण रेषा आणि आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांची, शिस्त या गोष्टीचा विचार करून जिल्ह्यातील सहकारी संस्थांचा विस्तार आणि कारभार केला जाईल.मांजरा परिवारातील साखर कारखान्यात सकारात्मक स्पर्धा सुरू ठेवून शेतकरी आणि ग्रामीण भागाचा विकास साधला जाईल, लातूर आणि परिसरातील दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. चाटा, भोयरा परिसरात तिसरा टप्प्यातील लातूर एमआयडीसीच्या विस्तारासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही या प्रसंगी आमदार अमित देशमुख यांनी दिली. माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या स्मारकाचे लोकार्पण आणि प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन नोव्हेबर महिन्यात करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगीतले.
ऊसासोबतच आता इंधन उत्पादक शेतकरी व्हावा- आमदार धिरज विलासराव देशमुख
आपला शेतकरी ऊस उत्पादनात खूप पुढे गेला आहे. परंतू, काळाची पावले ओळखून शेतकऱ्यांनी ऊस उत्पादनासोबतच आता इंधन उत्पादक व्हावे, असे आवाहन यावेळी बोलताना आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केले. ते पुढे म्हणाले, लोकनेते विलासराव देशमुख यांनी २१ वर्षांपूर्वी लावलेल्या विलास सहकारी साखर कारखान्याचे लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे. याचा अभिमान आणि आजची वाटचाल कौतुकास्पद आहे. या कारखान्याच्या माध्यमातून आज महिला शेतकरी भगिनींना सन्मानित करण्यात आले आणि प्रोत्साहन देण्यात आले सन्मान करण्यात आला. एक काळ होता या कारखान्याचे शेअर घ्या म्हणावे लागत होते, पण आज शेअर देण्याची मर्यादा संपली असे सांगावे लागत आहे. आपली कारखाना गाळप क्षमता, इतर उत्पादण करणारे सह प्रकल्प पाहता आपली मांजरा परिवारातील सर्व साखर कारखाने एकमेकांशीसकारात्मक स्पर्धा करीत आहेत. हे सर्व आपल्या सक्षम नेतृत्वामुळे होत आहे हे आवर्जून सांगावे लागेल. सहकारातून विकास हा आपल्याला आपल्या नेतृवाने
दिलेला मूलमंत्र आहे. याच मूलमंत्राचा अवलंब करीत नवीन सह उद्योग, नव उद्योजक, रोजगार निर्मिती अधिकाधिक कशी करता येईल यासाठी आपण सर्वांनी एकत्रित मिळून प्रयत्न आजवर केले आहेत. याही पुढे शेतकरी बांधवांसह साखर कारखाने, यावर अवलंबुन सर्वांचा विकास कसा होईल यासाठी आणखी प्रयत्न आवश्यक आहेत असं म्हणत जिल्हा बँकेचे सर्वतोपरी सहकार्य मिळेल असे ते यावेळी म्हणाले व शेवटी सर्वांना शुभेच्छा दिल्या.